ठाणे व पालघरमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कोविडमुक्त महाराष्ट्र, सशक्त महाराष्ट्र या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना नेते मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे व पालघर जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे.

त्याच माध्यमातून आमदार रविंद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेविका जयश्री फाटक, नगरसेवक दिपक वेतकर, नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका सुखदा मोरे यांच्या विशेष प्रयत्नातून आज पासून ठाणे महानगर पालिका प्रभाग क्रमांक १८ मधील किसन नगर नं १, महाराष्ट्र नगर, पडवळ नगर, रतन बाई कंपाउंड व आजूबाजूच्या परिसरातील मुलांसाठी संकल्प न्यू इंग्लिश स्कुल येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी विशेष लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

या लसीकरण केंद्राचा शुभारंभ आमदार रविंद्र फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या केंद्रावर दररोज सुमारे ५०० विद्यार्थी मुलांचे लसीकरण करण्यात येईल. त्यामुळे स्थानिक पालक वर्गांनी लवकरात लवकर आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे असे जाहीर आवाहन केले आहे.

यावेळी माजी महापौर संजय मोरे, नगरसेविका जयश्री फाटक, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक दीपक वेतकर, उपविभागप्रमुख पांडुरंग औटी, मधुकर होडावडेकर, शाखाप्रमुख बाबू महाडिक, महिला आघाडी विभाग संघटक सीमा औटी, अनमोल महाडिक, राजू सत्यम, महेंद्र कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.