ठाकरे सरकारचा पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला अखेर ठरला !

0

शिवसेनेला -राष्ट्रवादीला प्रत्येकी 13, तर काँग्रेसला किती?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. दरम्यान, खातेवाटप अद्याप जाहीर झालं नसलं तरी, महाविकासआघाडीतील पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा 13-13-10 असा पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरल्याचं म्हटलं जातं.

शिवसेनेला 13, राष्ट्रवादीला 13, काँग्रेसला 10 पालकमंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ज्या पक्षाचे जितके आमदार आहेत,त्यानुसार प्रत्येक पक्षाला पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना (56) आणि राष्ट्रवादी (54) यांचे आमदार जवळपाससमान असल्यामुळे दोघांना प्रत्येकी 13-13 पालकमंत्रिपदं मिळण्याची चिन्हं आहेत. तर काँग्रेसचे आमदार कमी (44) असल्यामुळे त्यांच्या वाट्याला 10 पालकमंत्रिपदं येऊ शकतात. खातेवाटपासोबतच पालकमंत्र्यांची नावं जाहीर होऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.