ट्रक चालकाचे दहा हजार व मोबाईल हिसकविणारे तिघे गुन्हे शोध पथकाच्या जाळयात

0

भुसावळ (प्रतिनिधी) : ट्रक चालकाच्या खिश्यातून दहा हजार व मोबाईल हिसकविणाऱ्या तिघां आरोपीना शहरातील जामनेर रोड हेवन हॉटेलच्या मागे शाह गल्ली येथून शनिवार रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले.

शहरात नाहाटा कॉलेजच्या पुढे असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर गाडीत चालक दि. 21 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास डीझल भरण्यासाठी जात असतांना चहा पिण्यासाठी पेट्रोल पंपासमोर असलेल्या रिक्षा स्टॉप जवळ फिर्यादी मेहेरबान सिंग जयसिंग नायक वय-40 रा.शिरपुर तलाव धार रोड इंदौर ( मध्य प्रदेश ) हे थांबले असता 3 अनोळखी अंदाजे 18 ते 20 वयोगटातील मुलांनी फिर्यादीस तु ईधर क्यु आया तेरा ईधर क्या काम है असे बोलुन त्यास धमकावुन गल्ली बोळात घेवुन गेले व त्या चापटा बुक्यांनी मारहाण केली तसेच खिशातुन 10,000/- रु रोख, 500/- रुपये किमतीचा मोबाईल जबरीने हिसकावुन घेतला
याबाबत फिर्यादी मेहेरबान सिंग जयसिंग नायक यांच्या फिर्यादी नुसार भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.न 793/2020 भा.द.वी कलम.394,323,504,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान या गुन्हयातील 3 संशयीत आरोपी दि.22 ऑगस्ट 2020 रोजी 9:30 वा.सुमारास शहरातील जामनेर रोड हेवन हॉटेलच्या मागे शाह गल्ली येथे आले असल्याची गुप्त माहीती पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली यावरुन गुन्हे शोध पथक घटनास्थळी गेले असता तीघा आरोपी यांना ताब्यात घेतले व पुढील चौकशीसाठी भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनला आणून जमा केले. ही कारवाई पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले जळगाव, अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके , पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड ,पोलीस निरिक्षक दिलीप भागवत , यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे स.पो.नि.अनिल मोरे , सहा.फौ.सुनिल सोनवणे, पो.ना रविंद्र बि-हाडे , किशोर महाजन ,रमण सुरळकर,महेश चौधरी पो.कॉ कृष्णा देशमुख, पोकॉ.विकास सातदिवे ,प्रशांत परदेशी,गजानन वाघ यांनी कारवाई केली .या गुन्ह्याचा तपास सहायक्क फौजदार सुनिल सोनवणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.