झोपेतच विषारी साप चावल्याने मुलाचा मृत्यू।

0

जामनेर तालुक्यातील वाकी खुर्द येथील घटना

जामनेर ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील वाकी येथे रात्री झोपेत असतांना साप चावल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सोपान उर्फ गोलू नथ्थु ढाकरे (वय -१६) असे या मृत मुलाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर असे की,  सोपान ढाकरे हा त्याच्या घरात रात्री खाटेवर झोपलेला होता. दरम्यान, रात्री  १ .३० वाजेच्या सुमारास त्याच्या पायाच्या बोटाला किडा चावल्याने त्याला वेदना जाणवू लागल्यामुळे त्याला जाग आली. यावेळी त्याने आजुबाजुला काही किडा किटकूल दिसते का म्हणून शोधा-शोध सुरू केली. त्याच्या आवाजाने घरातील मंडळींना जाग आली. त्यांनी सुद्धा आजूबाजूला पाहिले असता त्यांना काहीच दिसून आले नाही. त्यामुळे काही तरी कीडा किटकूल चावले असावे असा समज घरातील मंडळींना झाला. घरातील सर्वांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सोपान पुन्हा झोपी गेला. परंतु आज सकाळी त्याच्या तोंडामधुन पांढरा फेस येत असल्याचे कुटुंबीयांना लक्षात आल्याने  त्यांनी लागलीच त्याला जामनेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासले असता मुलाची प्रकृती नाजुक असल्याचे सांगत त्यांनी मुलाला जळगांव जिल्हा रुग्णाायलात हलविण्याचे सांगीतले. जळगांव जिल्हा रुग्णाालया उपचार सुरू असतांनाच या मुलाची प्राण ज्योत मालवली. नथ्थु ढाकरे यांना दोन मुले असुन एक मोठा मुलगा शिक्षण घेत आहे . तर मृत सोपान(गोलू) हा त्यांचा लहान मुलगा होता. त्याच्या मृत्युने वाकी खुर्द गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.