ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण अखेर मागे

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलप्राशन

नवी दिल्ली ;-लोकपाल आणि शेतकरी प्रश्नांसाठी दिल्लीतील रामलीला मैदानात आमरण उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज सातव्या दिवशी उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अण्णांनी उपोषण मागे घेतलं आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या असून उपोषण मागे घेत आहे, असं अण्णांनी जाहीर केलं. शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल-लोकायुक्तांची नियुक्ती या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावरील ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजारे यांच्या सत्याग्रहाचा आजचा सातवा दिवस होता. हे आंदोलन सुरु केल्यापासून तीन दिवसांंनी अण्णा हजारे यांचे वजन तीन किलोंनी कमी झाले होते. तसेच इतर आंदोलनकर्त्यांचीही प्रकृती खालावली होती. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत , जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आपले उपोषण अण्णा हजारे यांनी मागे घेतले. आपल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी अण्णा हजारे यांनी सहा महिन्यांचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे.कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णा हजारेंनी केलेल्या मागण्यांपैकी मान्य झालेल्या मागण्यांचे पत्र वाचून दाखवले. या पत्रात कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. मात्र या मागण्यांना तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. जनलोकपालची मागणी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडूणक प्रक्रियेतील महत्त्वाच्या बदलांना संमती या मागण्यांसाठी अण्णा हजारे मागील सात दिवसांपासून उपोषणाला बसले होते. आता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलप्राशन करून अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.