जैन स्पोर्टर्स अकादमीच्या गुणवंतांचा अशोक जैन यांच्याहस्ते गौरव

0

जळगाव दि.1
जैन स्पोर्टर्स कॅडमी अंतर्गत कार्य करणारे प्रशिक्षक, संघटनेचे प्रतिनिधी व खेळाडूंनी त्रैमासिकमध्ये जे यश मिळविले त्यांचा गौरव जैन इरिगेशन व जैन स्पोर्टर्सचे अध्यक्ष अशोक जैन यांनी 2018 या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कांताई सभागृहात एका छोटेखानी कार्यक्रमात केला..राष्ट्रीय पातळीवर शालेय बुद्धिबळ स्पर्धेत 14 वर्षांआतील गटात महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करून सुवर्ण पदक मिळवून दिल्याबद्दल भाग्यश्री पाटीलचा सत्कार करण्यात आला. टेबल टेनिसचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व असो. सचिव यांची जळगाव मनपाच्या प्रभारी क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल विवेक आळवणी यांचा सत्कार करण्यात आला..महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल फारुक शेख यांचा तर वाल्मिक पाटील, मनीषा व सोनल हटकर या पिता पुत्रीची निवड बास्केटबॉलच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अकोला कृषी विद्यापीठाने आयोजित अ. भा. आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत मुख्य आर्बीटर म्हणून कार्य केल्याबद्दल प्रवीण ठाकरे यांचा तर, प्रा डॉ.अनिता कोल्हे यांचा कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वेस्ट झोन खो खो स्पर्धेत आयोजन समितीत कार्य करून स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल गौरव करण्यात आला. मौलाना आझाद फाउंडेशन जळगावचा उत्कृष्ट क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल समीर शेख व सी.एम.चषक कॅरम ग्रामीण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेबद्दल फजल कासार यांना गौरविण्यात येणार आहे. यावेळी अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, नरेंद्र चौहाण आदी उपस्थित होते..

Leave A Reply

Your email address will not be published.