जेएनयू हल्ला प्रकरण : लवकरच गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांचे आश्‍वासन

0

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काल रात्री चेहरे झाकलेल्या लाठ्या-काठ्याधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले आहेत. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणी आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या असून लवकरच गुन्हे दाखल केले जातील असे स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिले आहेत.

दरम्यान, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात उमटू लागले आहेत. हल्ल्याच्या निषेधार्थ मध्यरात्री मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी कॅंडल मार्च काढला. यामध्ये विद्यार्थी नेता उमर खलिदही सहभागी झाला होता. तसेच मुंबई आयआयटीमध्येही विद्यार्थींनी पर्दशन करत निशेध दर्शवला आहे. तर पुण्यातही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.