जेएनयुत महिलेवर ऍसिड हल्ला

0

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात एका महिलेवर ऍसीड हल्ला करण्यात आला. सुमारे 100 बुरखेधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर रविवारी हल्ला केला. त्याचवेळी ही घटना घडली. लोखंडी सळ्या घेऊन या गुंडांनी विद्यार्थी आणि पालक यांच्यावर हल्ला चढवला होता.

या गुंडांच्या टोळीतील एकानेच या महिलेवर ऍसिड फेकल्याचा आरोप जामिया समन्वय समितीने (जेसीसी) केला आहे. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास बुरखा घातलेल्या गुंडांच्या टोळीने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्रवेश केला. त्यांनी जवाहररलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आयेशा घोष यांना बेदम मारहाण केली.

अभाविपच्या गुंडांसोबत शेकडो विद्यार्थी होते, वसतीगृहात अडकलेल्या या महिलेवर या गुंडांनी ऍसिड फेकले. या गुंडांकडे केवळ सळ्याच नव्हे तर अन्य घातक शस्त्रे असल्याचे छायाचित्रावरून दिसत आहे, असे जेसीसीच्या पत्रकात म्हटले आहे.

यासंदर्भात गुन्हा नोंद करावा. विद्यापीठ आवारात गुंडगिरी करणाऱ्या आणि हिंसाचार घडवणाऱ्यांवर कारवाई करावी. जवाहरलाल नेहरु विद्यापीठात घुसणाऱ्या या गुंडांची ओळख तातडीने पटवावी आणि त्यांव्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.