जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेचा छळ; पतीवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

व्यसनी पतीकडून विनाकारण मानसिक आणि शारीरिक छळ करीत चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणाऱ्या व गळा दाबून मारण्याची धमकी देणाऱ्या पतीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रामेश्वर कॉलनीमधील हनुमान नगर येथे सध्या माहेरी राहत असलेली विवाहिता वर्षा राहुल शेळके यांचा विवाह ३० जून २०२० रोजी पथराड ( ता.  भडगाव) येथील मूळ रहिवाशी राहुल रावसाहेब शेळके यांच्याशी पथराड येथे झाला होता. लग्नानंतर ५ महिने त्या पथराड येथे सासू- सासऱ्यांकडे राहत होत्या. त्यांचे पती राहुल शेळके आणि दीर प्रमोद शेळके हे रखोली (सिल्वासा, दादरा – नगर हवेली केंद्र शासित प्रदेश) येथे आर. आर. केबल्स नावाच्या कंपनीमध्ये नोकरीला असल्याने नंतर त्या पतीसोबत राहायला सिल्वासा येथे गेल्या होत्या.

तेथे १८ नोव्हेंबर २०२० ते २३ एप्रिल २०२१ या कालावधीत त्यांचा दारूच्या आहारी गेलेल्या व्यसनी पतीकडून विनाकारण मानसिक आणि शारीरिक छळ सुरु झाला. पती त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता. २३ एप्रिल २०२१ रोजी त्यांना मोबाइल चार्जरच्या वायरने गळा दाबून जीव घेईन अशी धमकी त्यांना आरोपी पतीने दिली होती.

हर्षा यांचा नवऱ्याकडून छळ होत असल्याने त्या माहेरी जळगावला येऊन राहू लागले. दरम्यान,  ८ मे २०२१ रोजी पहाटे ६ वाजता दारूच्या नशेत पती राहुल शेळके जळगावला त्यांच्या माहेरी येऊन त्यांना मारहाण करीत तू इकडे आलीच कशी ? बघ आता तुझे काय करतो, अशी धमकीही दिली होती.

याप्रकरणी आरोपी पती राहुल शेळकेंच्या विरोधात या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादवि कलम ४९८ ( अ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे कॉ. संजय धनगर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.