जिल्ह्यात कोरोनाच्या विस्फोटाला गैरहजर २३५ डॉक्टर जबाबदार

0
जळगाव –
आज एनएसयुआय व काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कोरोना या आजाराला जबाबदार असलेल्या काही गोष्टींचा धक्कादायक खुलासा एका पत्रकाद्वारे ई-मेल व ट्विटर च्या साह्याने  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  तथा  आरोग्यमंत्री  यांच्याकडे केला आहे.
जिल्ह्याच्या कोरोणाच्या या विस्फोटाला सर्वस्वी शासकीय महाविद्यालयाचे डीन तसेच जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी हे जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शासकीय महाविद्यालयांमध्ये २३५ विविध विभागांचे डॉक्टर नियुक्त आहेत. परंतु कोरोणा सारख्या महामारी मध्येही अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी शासकीय महाविद्यालयाचे हे डॉक्टर्स अजूनही आपल्या आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. महाविद्यालयाच्या डॉक्टर्सला शासनाकडून दरमहा लाखो रुपयांचे वेतन मिळत आहे याची पूर्ण कल्पना महाविद्यालयाचे डीन यांना आहे. वेळोवेळी प्रशासनाकडून या डॉक्टरांना कार्यावरती हजर होण्यासाठी सांगितल्यावरही स्वतःच्या जीवासाठी व स्वतःला कोरोणा होऊ नये या भीतीपोटी हे डॉक्टर्स अजूनही शासकीय महाविद्यालय म्हणजेच कोवीड रुग्णालय येथे हजर झाले नाही. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आज जिल्ह्यामध्ये कोरोणाची अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झालेल्याचा दावाही देवेंद्र मराठे यांनी केला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारीवर्ग तात्काळ आपल्या कार्यावरती हजर राहण्याची सूचना लॉक डाऊनच्या पहिल्या दिवसापासून दिलेली आहे. असे असल्यानंतरही जळगाव येथील शासकीय महाविद्यालयाचे 235 डॉक्टर्स अजूनही आपल्या कर्तव्यावर रुजू झालेले नाहीत व निव्वळ कोरोनाच्या भीतीपोटी हे डॉक्टर्स घरी बसून शासनाचा फुकटचा पगार घेत* आहे मग अशा डॉक्टरांचे करायचं काय?  असा सवाल श्री.मराठे यांनी केला आहे.
मेडिकल कौन्सिल असोसिएशन व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने तात्काळ या सर्व डॉक्टरांचे परवाने रद्द करावे, या प्रकाराची सर्व माहिती जिल्हाधिकारी यांनी तात्काळ शासकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर खैरे यांच्याकडून मागवावी व या अत्यावश्यक दिवसांमध्ये ही आपली सेवा न देणाऱ्या व आपल्या कार्यावर हजर न झालेल्या या सर्व डॉक्टरांवर ती यांचे तात्काळ परवाने रद्द करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठी यांनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांच्याकडे केली आहे.
यासंपूर्ण प्रकाराची सीबीआयकडून चौकशी झाली पाहिजे कारण 235 डॉक्टर्स यांनी केलेली ड्युटी व घेतलेला पगार याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे. अशा असंवेदनशील व बेजबाबदार डॉक्टर च्या विरोधात शासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येईल असेही श्री.मराठे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.