जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच ; आज १५६ रुग्ण आढळले

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून जिल्ह्यात आज १५६ कोरोना बाधित आढळले आहे. तर आज दिवसभरात 11 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४५८६ इतकी झाली आहे.

आज जळगाव शहर ५६, जळगाव ग्रामीण १८, भुसावळ १२, अमळनेर ७, चोपडा ८, पाचोरा ०४, भडगाव ०३, धरणगाव ७, यावल ०३, एरंडोल १, जामनेर १३, रावेर १२, मुक्ताईनगर १०, बोदवड ०१ v अन्य जिल्ह्यातील १ असे एकूण १५६ रुग्ण आढळले.

कोरोनामुळे दिवसभरात 11 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 1, चाळीसगाव, एरंडोल व यावल तालुक्यातील प्रत्येकी 2, पारोळा, भुसावळ, भडगाव, रावेर या तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज १०६ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत २७१७ रुग्ण बरे झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.