जिल्हाधिकाऱ्यांनी केली भुसावळ येथील गोदामाची पहाणी   

0

भुसावळ  –

२०१९ मध्ये होणाNया लोकसभेच्या सार्वजनिक निवडणूकांसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवण्यासाठी सर्व सोयींनी युक्त अशा जागेची निवड करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज ७ रोजी रावेर लोकसभा मतदार संघासाठी वापरण्यात येणाNया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ठेवायच्या शासकीय धान्य गोदामाची पाहणी केली. तसेच रेल्वेचे विभागीय प्रबंधक आर. के. यादव यांच्याशी नगरपालिकेच्या जुन्या इमारत स्थलांतराबाबत चर्चा केली. तुम्ही आम्हाला यावल रस्त्यावरील लागून असलेली रेल्वेची जागा उपलब्ध करुन द्या आम्ही पालिकेची जुना जागा तुम्हा देतो त्यानंतर पालिका कर्मचाNयांची हजेरी मस्टरची तपासणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्यासोबत निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार संजय तायडे, निवडणूक तहसीलदार सुरेश थोरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाच्या लोकसभा निवडणूकीसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बेंगलोर येथून प्राप्त होणार आहेत. ही इलेक्ट्रॉनिक यंत्रे चाळीसगाव व भुसावळ येथील गोडावून मध्ये ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाने निश्चीत केले असून त्याची पाहणी आज ७ रोजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केली. यावेळी संबंधित अधिकाNयांना सूचना देतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, गोडावूनमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीन सुस्थितीत रहावेत यासाठी गोडावूनमध्ये लाईट, एकझॉस पॅâन, सीसीटीव्ही वॅâमेरा आदी सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना त्यांनी संबंधीत यंत्रणेला दिल्यात. जळगाव लोकसभा मतदार संघात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव व पाचोरा तसेच रावेर लोकसभा मतदार संघात रावेर, चोपडा, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर व मलकापूर विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात ३३६० मतदान वेंâद्र असून त्यासाठी ७ हजार ४८८ बॅलेट युनिट, ४ हजार ३५४ वंâट्रोल युनिट तर ४ हजार ३५४ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध होणार आहेत. या सर्व यंत्रे सुस्थितीत राहावी यासाठी गोदामात आवश्यक त्या सर्व सुविधा तयार करण्याच्या सुचनाही यावेळी उपस्थितांना दिल्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.