जामियाला पाच जानेवारीपर्यंत सुटी

0

नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सोमवारी विद्यापीठाला पाच जानेवारी पर्यंत सुटी जाहीर करण्यात आली. सकाळी पोलिसांनी जबरदस्तीने प्रवेश करत विद्यार्थ्यांना मारहाण केली. यात सुमारे 100 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या आवारातून आपल्या सामानासह बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत होते.

येथील वातातवरण फारच खराब झाले आहे. ग्रंथालय उद्‌ध्वस्त झाले आहे. कालरात्रीपासून संचारबंदी जारी करण्यात आली अहे. काही खोल्याही पेटवून देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आमच्या मशिदीत प्रवेश केला. त्यामुळे आम्ही हे आवार सोडून जात आहोत. त्यासाठी आम्हावर आमच्या कुटुंबियांकडून दबाव आणला जात आहे, असे एका विद्यार्थ्याने नाव न छापण्‌याचष्या अटीवर सांगितले. विद्यापीठाने हिवाळी सुटी 10 दिवस आधीच जाहीर केली आहे. ही सुटी पाच जानेवारीपर्यंत असेल. रविवारी पोलिसांनी विद्यापीठात घुसून ग्रंथालयात आणि मीशदसीत बसलेल्या मुलांना बाहेर खेचून बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. त्यात सुमारे 100 जण जखमी झाले आहेत. या निदर्शनाचे पडसाद देशभर उमटत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.