जामनेरात एस.टी कर्मचा-याची गळफास घेऊन आत्महत्या

0

जामनेर :- शहरातील वाकी रोडवरील अशोक सम्राट नगर मधील रहिवासी तथा धुळे येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात हेल्पर पदावर कार्यरत असलेले जितेंद्र बाबूराव नेवरे (वय ४५) यांनी राहत्या घरातील वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली.

जितेंद्र नेवरे हे सकाळी झोपयाला जातो असे सांगून गेले होते. बऱ्याच वेळ होऊनही ते खाली आले नाही त्यामुळे परिवारातील सदस्य त्यांना उठवायला गेले असता त्यांना ईलेक्ट्रिक वायरने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत जितेंद्र यांचा मृतदेह आढळून अल्ला. त्यांना तात्काळ जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत जितेंद्रच्या मुलीनी रुग्णालयात एकच हंबरडा फोडला होता.त्यांचे ते दु:ख पाहून उपस्थितानाही हुंदके येत होते. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.प्रशांत महाजन यांनी शवविछेदन करुन मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आले असून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.