जाणून घ्या.. जळगावातील आजचे सोने-चांदीचे दर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत. सोन्याच्या दरात चढ-उतार होत असताना देखील सोन्याची मागणीत सतत वाढ नोंदवण्यात येत आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेंडीगच्या दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्याने 47000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी ओलांडली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (MCX), ऑक्टोबरच्या डिलिव्हरीसाठीचे सोने आज 0.15 टक्के वाढीसह ट्रेड करत आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे.

तसेच आंतराराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसापासून सोन्याचे दर कमी होतानाचे दिसून येत आहे. तर जळगाव सराफ बाजारात सोन्याचे दर कालच्या दराइतकेच असून चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.

जळगाव येथील सराफ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (दि.02) सोन्याचे दर 47000 होते, तेच दर आज देखील आहेत. यात आज कोणताही चढ- उतार पाहायला मिळाला नाहीय. तर आज चांदीच्या दरात मात्र घसरण होवून 66000 रुपये आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.