जळगाव विभागातील २२ एसटी कर्मचारी सेवेतून बडतर्फ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विलीनीकरणासाठी मागील दोन महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कामावर हजर न झालेल्‍यांना संपास कारणीभूत असल्याचे कारण दाखवत जळगाव विभागातील २२ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.

राज्‍य परिवहन महामंडळाचे राज्‍य शासनात विलनीकरण करण्याच्‍या मागणीसाठी महामंडळातील कर्मचारी गेल्‍या दीड महिन्‍यांपासन संपावर आहेत. मागणीवर तोडगा निघत नसल्‍याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. मात्र महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेने सुरु केलेल्या संपात २२ कर्मचाऱ्यांची अग्रेसर भूमिका असल्याचे कारण संगत एसटी महामंडळाने कारवाई केली आहे. या २२ कर्मचाऱ्यांपैकी ८ कर्मचारी जळगाव आगारात कार्यरत आहेत.

अगोदर निलंबित केलेल्या या कर्मचाऱ्यांना अनेकदा आपली बाजू मांडण्याची संधी देऊनही त्यांनी दुखवट्यात असल्याचे कारण सांगून प्रशासकीय चौकशीस नकार दिला होता. यावर एसटी प्रशासनाने आपणास बडतर्फ का करण्यात येऊ नये अशी नोटीस त्यांना बजाविली होती मात्र संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या जळगाव विभागातील २२ कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई केली आहे. सोमवारी केलेल्‍या या कारवाईत बडतर्फीचे आदेश पोस्‍टाच्‍या माध्‍यमातून कर्मचाऱ्यांना पाठविल्‍या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.