जळगाव जिल्ह्यात आज कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर तर 4 जणांची कोरोनावर मात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झालेला नाही. तर 4 जणांनी कोरोनावर मात केलीय.

भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंट या नव्या विषाणूने हळूहळू हातपाय पसरवायला सुरुवात केलीय. यामुळे महाराष्ट्राची देखील चिंता वाढली आहे. राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 10 वर पोहचली आहे. राज्यात याआधी पिंपरी चिंचवडमध्ये 06, पुण्यात 01, कल्याण डोंबिवली मध्ये 01 असे रुग्ण आढळून आले होते. तर आज मुंबईत 02 रुग्ण आढळून आले आहे. म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

जळगाव जिल्ह्यात होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या 07 आहे. तसेच आज एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाहीय. तर जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98. 18% आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.