जळगाव जिल्हा इंग्लिश टिचर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे ‘अनटोल्ड फॅक्ट्स ‘ विषयावर ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन !

0

भातखंडे( प्रतिनिधी) कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सर्वत्र शाळा बंद असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांचे शैक्षणिक प्रबोधन व्हावे ,या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन इंग्लिश टीचर वेल्फेअर असोसिएशन जळगावच्या वतीने झुम मीटिंग द्वारे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे .सदर व्याख्यानालेचेपहिले पुष्प इंग्रजी विषयाचे राज्यस्तरीय मार्गदर्शक प्रा . भरत शिरसाठ यांनी गुंफले .ही ऑनलाइन व्याख्यानमाला १२ऑक्टोबर ते १५नोव्हेंबर २०२०दरम्यान आयोजित करण्यात आली आहे .

इंग्लिश टीचर वेल्फेअर असोसिएशन ,जळगाव ( ETWAJ )ही नोंदणीकृत संस्था इंग्रजी शिक्षकांसाठी रचनात्मक कार्य करत आहे . लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे प्रबोधन आणि प्रशिक्षण होण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करत ‘अनटोल्ड फॅक्टस ‘ या विशेष व्याख्यानमालेचे झूम मीटिंगच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले असून जिल्हा आणि जिल्ह्या बाहेरीलही शिक्षक यात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत .

इंग्लिश टीचर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या व्याख्यानमालेत इयत्ता दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील लेखक आणि कवींच्या बाबतीत कधीही न ऐकलेलं , वाचलेलं असं सत्य श्रोत्यांसमोर सादर केले जात आहे . काल (ता . २० )झालेल्या टी .बी .पांढरे यांच्या व्याख्यानास नाशिक येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ . वाय .आर .सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती .तर उद्या (ता .२१ ) गणेश बच्छाव यांचे व्याख्यान असून त्यांच्या व्याख्यानात औरंगाबाद येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे (आंग्लभाषा तज्ञत्व ) संचालक डॉ . सुभाष कांबळे यांची उपस्थिती लाभणार आहे .

 

असे आहेत व्याख्याते –

प्रा. भरत शिरसाठ (स्वामी अँड फ्रेंड्स -बुक रिव्यू ) ,

प्रमोद आठवले ( अन इपिटोम ऑफ करेज) ,

सरिता वासवानी (अ लेसन इन लाइफ फ्रॉम अ बेगर ) ,

संजय बारी ( द बॉय हु ब्रोक द बँक ) ,

टी.बी .पांढरे ( द ट्वीन्स ) , गणेश बच्छाव ( लेट्स मार्च ) , सपना रावलानी ( बास्केट फुल ऑफ मून लाईट ) , कल्पना पाटील (बी स्मार्ट ) , अँग्वेश मायकेल ( स्टॉपिंग बाय वुड्स ऑन ए स्नोवी इव्हिनिंग ) , डी .बी . पाटील ( इफ ) ,शैलेंद्र वासकर ( ओ कॅप्टन माय कॅप्टन ) ,एम आर चौधरी ( भोली ) ,आर .के . पाटील ( अॅन एन्काऊंटर ऑफ स्पेशल काइंड ) ,हेमकांत लोहार ( अ टीनेजर्स प्रेयर ) ,नितीन चौधरी ( अन बीटेबल सुपर मॉम ) ,संगीता भोसले (यु स्टार्ट डाईंग स्लोली ) ,वर्षा अहिरराव (हीच फर्स्ट फ्लाइट ) ,शितल जडे (द वर्ल्ड इज माइन )

 

सदर व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी इंग्लिश टीचर वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ ,सचिव गणेश बच्छाव , उपाध्यक्ष प्रमोद आठवले, कोषाध्यक्ष एम .आर .चौधरी, सहसचिव टी .बी . पांढरे,कार्यकारी संचालक शेख असलम ताहेर ,संजय बारी , रणजित सोनवणे ,श्रीमती संगीता भोसले, श्रीमती सरला ढगे ,वाय. टी .पाटील ,प्रवीण मोरे, डी बी .पाटील ,भैय्यासाहेब सोनवणे , बी .एन. पाटील, हेमकांत लोहार, हरी माळी ,राहुल सोनवणे, शंकर भामेरे ,श्यामकुमार जाधव यांच्यासह कार्यकारीणी सदस्य प्रयत्नशील आहे .

 

“इंग्लिश टीचर वेल्फेअर असोसिएशनने आयोजित केलेल्या ‘ अनटोल्ड फॅक्टस ‘ या विषयावरील विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेला इंग्रजी विषय शिक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे .लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांसाठी प्रबोधन व्हावे या उद्देशाने सदर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून सर्व शिक्षक बांधवांचे चांगले सहकार्य मिळत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.