जळगावात पासपोर्ट सेवा केंद्राचे २३ रोजी उद्घाटन

0

खा. ए.टी.नाना पाटील यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव – जळगाव जिल्हातील नागरिकांची अनेक दिवसापासून मागणी असलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रसाठी मागणी होती. जळगाव जिल्हातील नागरिकांना पासपोर्ट सेवेसाठी मुंबई येथे ये-जा करावी लागत होती यासाठी जिल्ह्यातील नागरिकाना येण्याजाण्यासाठी लागणारा वेळ व पैसा लागत होता तो वाचणार आहे.
खासदार ए.टी.नाना पाटील यांनी लोकसभेमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरु व्हावे यासाठी वारंवार मागणी केली व् निवेदन दिले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन नुकतेच त्याअनुषंगाने जळगाव येथे नव्याने डाकघर पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असून याचे उद्घाटन २३ रोजी ११ वाजता बी-१ पोस्टल ऑफिस, बळीराम पेठ, तहसील कार्यालयजवळ, येथे खासदार ए.टी.नाना पाटील यांच्याहस्ते होणार आहे. तसेच आ. राजूमामा भोळे यांनी सुद्धा वेळोवेळी खासदार खासदार ए.टी.नाना पाटील यांचे कडे पाठपुरावा केला होता. खासदार खासदार ए.टी.नाना पाटील यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.