जळगावात आजाराला कंटाळून प्राध्यापकाची आत्महत्या !

0

जळगाव । नूतन मराठा महाविद्यातील ईलेक्ट्रॉनिक विभागातील प्राध्यापकाने आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आले. किशोर यादवराव देशमुख (वय-58, रा. शिवकॉलनी) असे मृत प्राध्यापकाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर असे कि, किशोर देशमुख हे नूतन मराठा महाविद्यालयात 1987 पासून प्राध्यापक म्हणून काम करत होते. अवघ्या सहा महिन्यानंतर त्यांची सेवानिवृत्ती होती. दरम्यान आज त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी संगितली. त्यांनी राहत्या घरात मध्यरात्री वरच्या मजल्याच्या खोलीत पंख्याला साडीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. आज सकाळी नेहमीप्रमाणे पत्नी कुमूदीनी ह्या पती किशोर यांना उठविण्यासाठी गेले असता त्यांनी आतून दार बंद केले होते. शेजारच्यानी दरवाजा तोडून पाहिले असता त्यानी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, लहान भाऊ, दोन बहिणी असा परीवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.