#Video : जळगावात अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यावर दगडफेक

0

जळगाव – शहरातील राजकमल चौक भंगाळे गोल्ड जवळ अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यावर ३० ते ३५ फळविक्रेत्यांनी दगडफेक करून जखमी केल्याची घटना आज दुपारी १२ च्या सुमारास घडली.  दीपक चंद्रकांत कोळी असे जमखी झालेले मनपा कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी शनीपेठ पोलीसात फळविक्रेत्यांवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

याबाबत सविस्तर असे की, महापालिकेने अतिक्रमण करणाऱ्यांवर धडक कारवाई करत आहे. मनपा उपयुक्त  संतोष वाहुळे यांच्या पथकाने आज कारवाई करताना काही फळ विक्रेत्यांकडून गोलाणी मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून दिली असताना देखील ते बाहेर विक्री करीत असल्याचे समजल्याने आज दुपारी कारवाई करीत असताना काही लोकांच्या जमावाने कारवाईस गेलेल्या पथकावर दगडफेक केली . यात एक कर्मचा

री जखमी झाला असून याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते .

Leave A Reply

Your email address will not be published.