जयहिंद विद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

0

चाळीसगाव, प्रतिनिधी – आठ जानेवारी रोजी जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हरी महारु खलाणे यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटन चाळीसगाव पोलीस उप अधीक्षक सचिन गोरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक हरी खलाणे हे होते.

तसेच प्रमुख मान्यवर म्हणून म.फु.सा.व शै.वि.मंडळाच्या अध्यक्षा सौ.लताताई अशोक खलाणे मॅडम, म.फु.सा.व शै.वि.मंडळचे उपाध्यक्ष जगन्नाथ हरी खलाणे, चाळीसगाव गट शिक्षणाधिकारी विलास भोई, चाळीसगाव शिक्षण विस्तार अधिकारी जे.एस.महाजन,रा.शि.प्र.मं, चाळीसगाव चे संचालक विश्वास चव्हाण, एन.सी.वाघ सर तसेच चाळीसगाव नगरपालीकेचे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, संजय रतनसिंग पाटील, सोमसिंग राजपूत, विजयाताई पवार व अमृतकार आप्पा विद्यलयाचे प्राचार्य अभिजित खलाने व सम्राट अशोक प्राथमिकच्या मुख्याद्यापीका सोनाली महाजन हे उपस्थित होते. तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक डाॅ.प्रमिलताई पुरणापात्रे विद्यालयाचा, व्दितीय क्रमांक सम्राट अशोक प्राथमिक विद्यालयाचा, व तृतीय क्रमांक कळंत्री विद्यालयाचा आला. विजयी स्पर्धकांचे संस्थेच्या अध्यक्षा यांनी त्याचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.