जन धन खाते आधारशी लिंक करा, तुम्हाला मिळतील 5000 रुपये

0

नवी दिल्ली ! प्रधानमंत्री जन धन योजने (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) अंतर्गत देशातील गरिबांचे खाते बँका, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये झिरो बॅलन्सवर उघडले जाते. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) अंतर्गत ग्राहकांना खाती उघडता येतात. यामध्ये तुमच्या खात्यात जर काही शिल्लक जरी नसेल तरीही तुम्ही 5 हजार रुपये काढू शकता. या खात्यासह कोणती आकर्षक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत आणि हे खाते कसे उघडले जाईल ते जाणून घेउयात. इथे हे देखल लक्षात घेण्यासारखे आहे की ज्या लोकांचे खाते आधारशी लिंक केले जाईल केवळ त्यांनाच या खात्यासह उपलब्ध सुविधांचा लाभ मिळेल.

अशा प्रकारे आपल्याला 5 हजार रुपये काढण्याची सुविधा मिळते

पंतप्रधान जनधन खात्यावर ग्राहकांना 5000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. या ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय PMJDY खात्यालाही आधार कार्डशी लिंक केले पाहिजे. या योजनेंतर्गत पंतप्रधान मोदींचा उद्देश प्रत्येक कुटुंबासाठी बँक खाते उघडणे हा होता. या जन धन योजनेंतर्गत आपण आपल्या 10 वर्षाखालील मुलाचे देखील खाते उघडू शकता.

 ओव्हरड्राफ्ट सुविधा काय आहे ते जाणून घ्या

ओव्हरड्राफ्ट सुविधा ही एक अशी सुविधा आहे ज्या अंतर्गत खातेदार त्याच्या खात्यात पैसे नसतानाही खात्यातून पैसे काढू शकतो. म्हणजे खातेदारांच्या खात्यातील शिल्लक शून्य असेल. जर कोणतेही पंतप्रधान जनधन खाते हे आधार कार्डशी जोडलेले नसेल तर त्या खात्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ मिळणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.