छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने व्याख्यान : विविध कार्यक्रम संपन्न..

0

भव्य बुलेट रॅली, 

जळगाव दि.17 – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवातर्फे आज शहरात शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करतांना  नुतन मराठा महाविद्यालयात आज डॉ प्रताप जाधव यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रमाला उपप्राचार्य, दीपक सुर्यंवंशी तसेच शिवजयंती समितीची कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी डॉ. जाधव यांनी आजच्या तरूणांपुढील अव्हाणांचा वेध घेतांना शिवाजी महाराजांच्या विचारांचे महत्व मोठ्या प्रमाणावर आहे. शुन्यातून विश्‍व निर्माण करणारे, कार्यशील बना, आपल्या सोबत सर्वांना जोडा आपल्या राज्याची उभारणी केवळ शौर्यावर नाही तर त्याला चातुर्याने दिशा दिल्याशिवाय कुठल ही मोठ कार्य साकारता येणार नाही. अशा विविध अंगानी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा इतिहास समजून घेतला तर तो आदर्श घडवेल असे ते म्हणाले छत्रपतींच्या जीवनाचे सविस्तर विवेचन त्यांनी केले यावेळी महाविद्यालयातील मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होत.

बुलेट रॅली-अभिनव अशी भव्य बुलेट रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ दुपारी 4 वाजता काव्यरत्नावली चौकातून पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी झेंडा दाखवून केला. याप्रसंगी महापौर ललितभाऊ कोल्हे, शंभु पाटील, विनोद देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, कैलासआप्पा सोनवणे, मुकंद सपकाळे, पुरूषोत्तम चौधरी, सुरेंद्र पाटील, यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.. या बुलेट रॅली नागरिक मोठ्या संख्येने  बुलेट रॅलीत सहभागी झाले होते. शहरातील आकाशवाणी चौकात रॅलीचा समारोप झाला. सुमारे 500 हून अधिक नागरिकांचा सहभाग असलेली ही भव्य रॅली सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. या रॅलीमुळे शहारातील संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण, कैलास सोनवणे, मुकुंद सपकाळे,खुशला चव्हाण,आबा कापसे यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या रॅलीत तरूणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

आज शहरात मॅरेथॉनस्पर्धा,  महिला बुलेट रॅली, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

सर्वसावेशक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज शहरात पाच किमीची मेरेथॉन स्पर्धा किरण बच्छाव रनर्स गृप च्या वतीने घेण्यात येणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, माजी महापौर रमेशदादा जैन, आदी मान्यवर झेंडा दाखवून सुरू करतील, दुपारी 4 वाजता महिलांची दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीचे नेतृत्व रोहिणीताई खडसे करणार आहेत. विविध जाती, धर्मांच्या व संस्थांच्या सुमारे 500 महिलांचा सहभाग असणार आहे. तर पिंप्राळा येथे डॉ. सय्यद जलाल यांचे कीर्तन शिवाजी चौक येथे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला मा. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची उपस्थिती राहणार आहे. असे शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.