चोसाकाच्या हंगामी कर्मचाऱ्यांना कामावर घ्या; अन्यथा आंदोलन

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चोपडा साखर कारखाना सुरु झाला असुन सुमारे तीन वर्ष बंद अवस्थेत होता. आता सुरळीत सुरू झाला असुन बारामती एग्रोने भाड़ेतत्त्वावर चालवण्यास घेतला असुन सर्व संचालक मंडळ आणि शेतकरी यांना विश्वासात घेवून सुरु केला आहे. मात्र काही पन्नास ते साठ कर्मचाऱ्यांना कामावर घेतले नसुन त्यांच्यावर उपासमारी ची वेळ आली आहे. त्यांना कामावर घ्यावे यासाठी बारामती एग्रोच्या अधिकाऱ्यांसोबत विजय दत्तात्रय पाटील, चोसाका संचालक यांनी वारंवार त्यांना विनंती केली आणि यापूर्वी ही बारामती एग्रोच्या संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांनी देखील सांगितले होते की, एकाही कर्मचाऱ्याला कमी केले जाणार नाही असे आश्वासन दिले होते.

पण आता कारखाना सुरळीत सुरु झाला तरीही तर हंगामी 50 ते 60 कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं नाही म्हणून सर्वच कर्मचारी हे बाळासाहेब पाटील माजी जि. प सदस्य व चोसाका संचालक यांना भेटले व त्यांची व्यथा मांडली.

बारामती एग्रोचे उपाध्यक्ष गुळवे यांनीही याआधी सर्वच कर्मचारी कामावर हजर होतील अन्याय कोणावर ही होणार नाही असं म्हटल होते. पण त्यांनी ही त्यांचा शब्द पाळला नाही. म्हणून 17 डिसेंबर रोजी 11वाजेच्या सुमारास हंगामी कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांसह धरणे आंदोलन करू असं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.