चिनावल, कुभारखेडा येथे प्रांताधिकारी , बी.डी.ओ.कडून पाहणी व नागरिकांना आवाहन

0

चिनावल, ता.रावेर (वार्ताहर) : येथे आढळलेल्या कोरोना पाॅझीटिव्ह रूग्ण व संशयीत ईसमाच्या निधनानंतर फैजपूर उपविभागीय अधिकारी व कोरोना योद्धा डॉ अभिजित थोरबोले , पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे चिनावल प्रा.आ.केदराच्या वैद्यकीय अधिकारी डॉ विजया झोपे व त्यांच्या स्टाप ने भेट दिली.

येथे आधिच प्रतिबंधित केलेल्या व आज प्रतिबंधीत केलेल्या इंदिरा नगर भागात भेट देऊन येथील नागरिकांना कन्टेनमेट व बंपर झोन मध्ये आपण आहात कुणीही बाहेर ये जा करू नये आवश्यक त्या गरजू वस्तू स्वयमसेवका मार्फत मागवा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण प्रशासन, ग्रामपंचायत, आरोग्य प्रशासन आपल्या पाठीशी आहे असे आवाहन केले तर नियम मोडणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करणेत येईल असा इशारा ही दिला. सदर वेळी सरपंच, पोलीस पाटील , वैद्यकीय कर्मचारी स्वयमसेक सोशल डिस्टीग चे पालन करीत हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.