चाळीसगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्त पिंकाचे पंचनाम्याची पथक नियुक्त !

0

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी बैठकीत दिले आदेश

चाळीसगाव :  तालुक्यातील नवनिर्वाचित आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात चाळीसगाव कृषि विभागाचे तालुका कृषी अधिकारी साठे साहेब, कृषी सहाय्यक यांची बैठक  घेतली. या बैठकीत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी साहाय्यक कृषी अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक असे पथक तयार करण्यात आले.

यावेळी अवकाळी पावसामुळे तालुक्यातील  शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अश्या परिस्थितीत प्रशासनाने संपूर्ण ताकतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे त्यासाठी त्वरीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात.  तसेच यावेळी ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी केली असेल अश्या शेतकऱ्यांना पंचनामा, अर्ज सादर करण्यासाठी मदत करावी तसेंच विमा कंपनी सोबत समन्वय घडवून आणत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात यावी.अशाही सुचना अधिकार्यांना दिल्या.

ज्यांचा  शेतकऱ्यांचे पीकविमा पॉलिसी नसेल अशाही शेतकऱ्यांचे त रीतसर पंचनामे करण्यात यावेत.व  तातडीने आपला अहवाल शासनाकडे सादर करावा. अशा सक्त सूचना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.