चांगदेव येथे शेतमजुराची हत्त्या

0

मुक्ताईनगर |  वृत्तसंस्था

तालुक्यातील चांगदेव कासारखेड शिवारातील शेतात शेतमजुराची शिरच्छेद करून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. भिका दयाराम पाटील (55, मूळ रा.जुनोना, ता.भुसावळ) असे शेत मजुराचे नाव आहे. सुमारे दिड वर्षांपूर्वी भिका पाटील हे विनायक बाजीराव पाटील यांच्याकडे कामाला लागले होते तर वल्लभ नगर भागात राधाबाई चौधरी यांच्या घरात पत्नी मुलांसोबत तो राहत असल्याचे सांगण्यात आले. चांगदेव येथील विनायक बाजीराव पाटील यांच्या कासारखेडा शिवारातील केळी बागेच्या शेतात भिका पाटील यांचा मृतदेह सकाळी आढळताच खळबळ उडाली. आरोपींनी भिका पाटील यांचे पाय बांधून त्यांचा शिरच्छेद धडावेगळा केला. इतक्या निर्घृणपणे हत्त्या करण्यामागचे कारण काय असावे या बाबत तर्कवितर्क लढवले जात असून मुक्ताईनगर पोलिसांकडून नेमक्या कारणांचा शोध सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.