चहा विक्रेत्यांचा मुलगा बनला सहाय्यक कक्ष अधिकारी

0

अमळनेर,दि.20-
उगवतीच्या खडतर प्रवासाचे आव्हान संयमीत मनाने व कणखर मनगटाचे आधारे पेलून जीवन वाट फुलवनं सार्‍यांनाच साधत नाही. पवन खलाने या युवकाने आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर कापडणे गावाचे नाव महाराष्ट्र राज्यभर नावलौकिक करून आजच्या तरुण पिढीला एक आदर्श ठरला आहे प्रतिकूल परिस्थितीशी सकारात्मकतेने झुंजत लोकसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून इच्छा असेल तर सफलता चरण स्पर्श करते हे सिद्ध केले आहे.
पवन डिगंबर खलाणे एम.पी.एस.सी.मार्फत 2018 मध्ये घेण्यात आलेल्या पी.एस.आय, ,एसटीआय ,ए.एस.ओ. परीक्षेतील सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई या पदावर राज्यातून 15 व्या क्रमांकाने ओबीसी तून दुसर्‍या क्रमांकाने त्याची निवड झाल्याने सर्वस्वी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पवन डिगंबर खलाणे हा मूळचा कापडणेचा .. .परिस्थिती हालाखीची… वडील तिस वर्षापासून चहाची हॉटेल चालवीत आहेत.. आई रोजंदारीने काम करून ..दोन मुलं एक मुलगी यांना शिक्षणाचे बाळकडू लहानपणापासूनच देऊन त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार केले. मुलांसाठी आई-वडिलांनी रात्रंदिवस काबाडकष्ट करत भविष्यातील पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पवन खलाने स्पर्धापरीक्षेची तयारी करीत असताना अनेक वेळा अपयश आले पण मनातील आत्मविश्वास व जिद्द न सोडल्यामुळे अखेर त्याला यश मिळाले आपल्या कष्टकरी आई-वडिलांना स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन परिस्थिती बदलणारा भगीरथ मिळणे हे भाग्याचं लक्षण आहे. पवन खलाणे चा लहान भाऊ औरंगाबाद येथे पोलीस कॉन्स्टेबल आहे.तर बहीण मुंबई येथे असून मेव्हणे निलेश माळी
पोलीस कॉन्स्टेबल आहेत.
पवन खलाने हा सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाल्यामुळे मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उभयंतांनी प्रामाणिक कर्म दैवाला ही दिशा बदलायला लावते हा इतिहास रचला आहे. त्याच्या ऐतीहासिक कर्तृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.