घरगूती गणेशोत्सव लोक आरास स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद आता लाईक्स आणि व्ह्यु वर गुणांकन

1

घरगूती गणेशोत्सव लोक आरास स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद १७० बाप्पांचा समावेश ::: १० सप्टेंबर पर्यंत केले जाणार लाईक्स आणि व्ह्यु वर गुणांकन

जळगाव- रतनलाल सी बाफना ज्वेलर्स पुरस्कृत आणि लोकशाही , लोक लाईव्ह च्या वतीने घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रासह विदेशातून देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला एकूण १७० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला आहे.
स्पर्धेत सहभागी सर्वांच्या घरातील गणपती समोर केलेल्या आरास चा व्हिडिओ लोकलाईव्ह चॅनल वर प्रसारित करण्यात आला आहे.

या अनोख्या स्पर्धेत महाराष्ट्र आणि परदेशातील मराठी कुटुंबातील गणेश मूर्तीचे आणि आरास चे दर्शन गणेश भक्तांना होत आहे.
प्रथमच अशी भव्य स्पर्धा होत आहे.
लोक लाईव्ह चॅनल वर हे सर्व व्हिडिओ कायमस्वरूपी राहणार आहे. मात्र १० सप्टेंबर रोजी रात्री 12 पर्यंत प्रत्येक व्हिडीओचे व्ह्यु आणि लाईक्सचे गुणांकन केले जाणार आहे.
दरम्यान राज्यातील तीन वेगवेगळ्या विभागातील नामांकित परीक्षक परीक्षण करीत आहे.
मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे स्पर्धेचा निकाल लागण्यास नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागत आहे.
अधिक माहिती साठी
व्हाट्सअप क्रमांक –
९०९६२०८०९९
वर संपर्क साधावा.
सर्व गणेशभक्तांनी
लोक लाईव्ह च्या चॅनल ला भेट देऊन

सर्व गणपती बाप्पा चे दर्शन घ्यावे आणि जो आपल्या मनाला भावेल आवडेल त्याला लाईक करावे ही विनंती लोकशाही लोकलाईव्ह आणि रतनलाल बाफना ज्वेलर्स च्या वतीने करण्यात आली आहे.
स्पर्धेत विजेत्या आरास ला पाहिले पाच हजार दुसरे तीन हजार तर तिसरे दोन हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
तर लोकप्रिय आरास म्हणजे सर्वात जास्त व्ह्यु आणि लाईक्स आणि कॉमेंट्स चे गुणांकन करून पाहिले तीन हजार दुसरे दोन हजार तर तिसरे एक हजार चे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सहभागी सर्वांना ईप्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
एका भव्य ऑनलाइन कार्यक्रम द्वारे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

1 Comment
  1. amit suresh kasliwal says

    super

Leave A Reply

Your email address will not be published.