घरगुती गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काॅग्रेसचे उद्या आंदोलन

0

यावल |  प्रतिनिधी

जगावं की मरावं या प्रश्नावर आता ‘मन की बात’चं उत्तर दिसतंय की सर्वसामान्य माणसाने मरावंच, असे म्हणत जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला  महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्या यावल टी पाॅईट वर राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्तानी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मुकेश येवले सर व फैजपुर शहर राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष अनवर खाटीक यावल शहराध्यक्ष करीम मन्यार युवक तालुका अध्यक्ष देवकात पाटील यावल युवक शहराध्यक्ष हितेश गजरे फैजपुर युवक शहराध्यक्ष विनोद कोल्हे व सर्व फ्रंडल च्या तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष  यांनी केले .

आज महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य गांजला आहे. त्यात आता घरातल्या गृहिणीचंही बजेट नरेंद्र मोदींच्या भाजपाशासित केंद्र सरकारने कोलमडवले आहे. ज्यावर सर्वसामान्य माणसाच्या घरातला स्वंयपाक होतो तो एलपीजी गॅस सिलिंडरचा दर अचानक २५ रुपयांनी वाढवला आहे. जगावं की मरावं या प्रश्नावर आता ‘मन की बात’चं उत्तर दिसतंय की सर्वसामान्य माणसाने मरावंच, असे म्हणत जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोविड निर्बंधाचे सगळे विहित नियम पालन करुन अवश्य उपस्थितीत रहावे  असे आवाहन राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुकेश येवले यांनी केले आहे.

मुकेश येवले

Leave A Reply

Your email address will not be published.