घनकचरा कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या..!

0

अहमदपूर (प्रतिनिधी) आज सर्वत्रच घनकचरा व्यवस्थापनावर भर दिला जात आहे मात्र या वर काम करणार्या कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष होत असून घनकचरा व्यवस्थापनावर कार्यरत महीला व पुरूष कामगारांना शासकीय सेवेमध्ये समावून घ्यावे अशी आग्रही मागणी सम्राट मित्रमंडळाच्या वतीने यूवक नेते डाॅ. सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

येथील तहसिलदार यांच्या मार्फत सम्राट मित्रमंडळाच्या वतीने  दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,अहमदपूर जि.लातूर नगर परिषद ही ‘ब’ वर्ग दर्जाची नगरपरिषद आहे.या नगर परिषदेमध्ये घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत महिला व पुरुष कंत्राटी स्वरूपामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कामावर आहेत.प्रत्येक वर्षी घनकचरा व्यवस्थापनाच्या नव्याने निविदा काढल्या जातात.ज्या कंत्राटदाराला निविदा मंजूर होते त्या कंत्राटदारा मार्फत गेल्या पंधरा वर्षापासून संबंधीत कामगार काम करत आहेत.तसेच दिलेल्या तुटपुंज्या पगारा वर आज ना उद्या आपण नगर परिषद आस्थापनेवर कायम होवून जावू या आशेवर सदरील कामगार काम करून आपली उपजीविका भागवत आहेत.

भविष्यातील नगरपरिषदेच्या आस्थापनेवर होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये कंत्राटी स्वरूपामध्ये गेल्या पंधरा वर्षा पासून काम करत असलेल्या सर्व महिला व पुरुष कामगारांना नगरपरिषदेच्या शासकीय सेवेमध्ये विशेष बाब म्हणून प्राधान्याने भरती करून घ्यावे.

या बाबत येत्या विधानसभेच्या अधिवेशनावर कामगारांचा मोर्चा तसेच धरणे व निदर्शने अंदोलन करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर यूवकनेते 

डाॅ.सिध्दार्थकूमार सूर्यवंशी, गफारखान पठाण,राणी गायकवाड, गवळण मोरे,सूप्रिया सोनकांबळे,रेखा गूळवे,चांगूणा जाबाडे,अनिता कांबळे,अनिल मूसळे,सचिन बानाटे,सिताराम राठोड,देविदास ससाणे,भैय्या भालेराव,जिलानी शेख,किरण वाघमारे आदीं सह ऐंशी कामगारांची नांवे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.