ग्रीन फाउंडेशन राज्यभरात राबवते समाजाभिमुख उपक्रम

0

भातखंडे (प्रतिनिधी) सामाजिक बांधिलकीतून राज्यभरात नावारूपाला आलेले  ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे अनेक समाजभिमुख उपक्रम राबविले जात असतात. गरजू मुलांना गणवेश वाटप तसेच गुड टच बँड टच कार्यक्रम पक्ष्यांना उन्हाळ्यात धान्य व पाण्याची सोय करून देणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे ,वृक्ष लागवड केलेली झाडांना पाणी देणे, वृक्षारोपण मोहीम राज्यभर राबवणे ,रक्तदान शिबिरे आयोजित करणे, देशासाठी शहीद झालेले वीर जवान यांना श्रद्धांजली वाहने, उन्हाळ्यात पाणी व्यवस्थापन करणे, वृक्ष लागवड केलेली झाडे व्यवस्थित त्यांची वाढ होते आहे.

किंवा नाही त्या झाडांची पाहणी करणे व निगा राखणे राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी देशाभिमान जागृत ठेवण्यासाठी तिरंग्याचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करणे, राज्यभरात आरोग्य शिबिरे आयोजित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, अनाथ आश्रम मध्ये धान्य वाटप करणे, विद्यार्थ्यांच्या मनात ऐतिहासिक वारसा जतन होण्यासाठी व राज्यभरातील किल्ल्यांची माहिती होण्यासाठी किल्ला स्पर्धा आयोजित करणे, ग्रीन फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षक दिन साजरा करणे, झाडांना पाणी देण्याचे नियोजन करणे, इफत्तार पार्टीचे नियोजन करणे, शालेय साहित्य वाटप करणे, ग्रीन फाउंडेशनच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करताना कोणतेही गिफ्ट किंवा बुके न देता झाड देऊन त्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करणे, डोंगरात पाझर तलाव खोदणे, तीर्थक्षेत्र रामदरा येथे स्वच्छता मोहीम राबवणे, बाटली उपक्रम राबवणे, विनोद दादा प्राईज यांच्या सहकार्याने वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करणे, अनेक समाज भिमुख उपक्रम राबवत असताना समाजामध्ये जनजागृती करणे, सर्व क्षेत्रातील मान्यवर वृक्षारोपणासाठी बोलवणे , विद्यार्थ्यांसाठी कपडे व शालेय साहित्य वाटप करणे, वाढदिवसावर खर्च न  करता ग्रीन फाउंडेशनला मदत करणे. लोणी काळभोर प्लास्टिक मुक्त करण्याचे ध्येय, झाडांचे संगोपन, असे अनेक विविध उपक्रम ग्रीन फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभर राबवले जात असतात. हे सर्व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रीन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री अमित जी जगताप यांचे अनमोल मार्गदर्शन व त्यांचे सर्व सभासद प्रचंड मेहनत घेत असतात आणि त्या मेहनतीच्या जोरावर सर्व कार्यक्रम ते यशस्वीरित्या पार पाडत असतात त्यांच्या या समाजाभिमुख कार्याला व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

Leave A Reply

Your email address will not be published.