ग्रीन फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय खुली ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजन

0

भातखंडे (प्रतिनिधी) : मराठी मातीशी नाळ जोडलेल्या कवी,लेखक,साहित्यिक आणि रसिकांमध्ये वक्तृत्वची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमितदादा जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे.  या स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे – १) वृक्ष संवर्धन काळाची गरज २) मी अनुभवलेले अमितदादा जगताप ३) शेतकरी आत्महत्या एक ज्वलंत समस्या ४) माणसातील देवमाणुस पोलिस, डॉक्टर, पत्रकार, नर्स, स्वच्छतादूत या वक्तृत्वचा समावेश आहे.

वक्तृत्व स्पर्धाचे नियम – १) व्हिडिओ  ५ मिनिटांचा असावा २) आपला व्हिडिओ आम्हाला ९५०३०३८०३५  या व्हॉटसफ नंबर. किवा [email protected]   या वर पाठवावे  ३) व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर २०२० पर्यंत असेल. ४) सदर स्पर्धे खुल्या गटांमध्ये घेतल्या जाणार आहे ५) स्पर्धा मराठी भाषेत होईल ६) प्राप्त वक्तृत्वाचे मुल्यांकन परिक्षण मंडळाकडून केले जाईल ७) स्पर्धाचे बक्षिस वितरण सोहळा ऑनलाईन पध्दतीने २९ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ४ वाजता होईल ८) वरील पैकी एकाच विषयावर वक्तृत्व करावे .

ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा  पारितोषक पुढील प्रमाणे १) प्रथम पारितोषिक- २२२२ रूपये व सन्मानपत्र सौजन्य- अमिर फिरोज सय्यद   २) द्वितीय पारितोषिक- ११११ रूपये  व सन्मानपत्र सौजन्य- अक्षय रामचंद्र पाटील  ३) तृतीय पारितोषक- ९९९ रूपये  व सन्मानपत्र सौजन्य- किरण बाचकर ४) चतुर्थ पारितोषक- ७७७ रूपये व सन्मानपत्र सौजन्य- स्वप्निल कांबळे   या स्वरूपात असून गुणवंत स्पर्धकांना पारितोषिके आणि सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र  ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी जनसंपर्क- ९५०३०३८०३५\७९७२६९५१९५ या नंबर वर संपर्क साधावा. व या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ग्रीन फाउंडेशन पुणे जिल्हा अध्यक्ष अमीर फिरोज सय्यद यांनी केले .

Leave A Reply

Your email address will not be published.