ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची कास धरावी- रक्षाताई खडसे

0
मुक्ताईनगर,दि. 1-
ग्रामीण भागामध्ये गुणवत्ता खूप आहे मात्र कस्तुरीमृगाप्रमाणे आपल्यालाच आपल्याजवळ असलेल्या    गुणवत्तारुपी कस्तुरीचा पत्ता लागत नाही, त्यामुळे आपण त्या भागाला पैलू पाडून आपली गुणवत्ता सुधारावयास हवी, असे प्रतिपादन रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा. रक्षाताई खडसे यांनी केले.
मुक्ताईनगर येथील जी. जी. खडसे महाविद्यालयात मुक्ताईनगरचे आ. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. सदर परीक्षेस महाविद्यालयीन स्तरावरील 450 विद्यार्थी उपस्थित होते. या परीक्षेत प्रथम क्रमांकाचे रुपये 2100/-चे पारितोषिक विभागून कु. कुरकुरे जागृती संजय व टोकरे वैभव राजेंद्र यांनी मिळवले तर द्वितीय क्रमांकाचे रुपये 1100/-चे पारितोषिक  विभागून पठारे अभिषेक रावसाहेब, पाटील अक्षय कैलास, शेंदुरकर श्वेता लीलाधर व जावरे सागर गजानन यांनी मिळवले तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून लोखंडे शितल निवृत्ती ,खिरोळकर अर्जुन विपुल व आवारकर मेघा श्रीकृष्ण यांनी मिळविले.  याप्रसंगी व्यासपीठावर मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सी. एस. चौधरी, मुक्ताईनगर चे प्रतिष्ठित नागरिक नितीन जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. आर. पाटील,उपप्राचार्या  एन.ए. पाटील, उपप्राचार्य एस. एम. पाटील तसेच इतर प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.सी.जे. पाटील, प्रा.डी.आर. कोळी, प्रा. वंदना चौधरी, प्रा.सी. ए .नेहेते, प्रा. डॉ. पी. एस. प्रेमसागर व प्रा. डॉ. गायकवाड, यांनी प्रयत्न केले तर  प्राध्यापक व्ही.बी. डांगे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.