गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घर जळून खाक !!

0

अमरावती (प्रतिनिधी) : तिवसा तालुक्यात येणाऱ्या काटसुर येथे गॅस सिलेंडर चा पाइप लीकेज झाल्याने सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागल्याची घटना 11 मार्च 2021 रोजी घडली या घटनेत घरातील मंडळी घराबाहेर पडल्यामुळे जीवित हानी टळली मात्र कौलारू संपूर्ण घर जळून खाक झाले. आगीमुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले असून घरातील जीवनावश्यक वस्तूंसह घरातील धान्य जळून खाक झाल्याने सदर कुटुंब उघड्यावर आले आहे.

प्राप्त माहितीनुसार तिवसा तालुक्यातील काटसुर येथील विष्णू महादेव फसाटे यांची मोठी बहीण सकाळच्या सुमारास गॅस वर चहा बनविण्यासाठी गेलि . व शेगडीला लाइटर लावताच . गॅस सिलेंडर लिकेज असल्याने आगीचा मोठा भडका उडाला व सिलेंडरचा स्फोट झाला.

या स्फोटा च्या आवाजामुळे गावातील नागरिक भयभीत झाले होते. या स्फोटामुळे घराला लागलेल्या आगीत गावकऱ्यांना आगीची लोंढे दिसले. त्यानंतर संपूर्ण गावातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. घराघरातील पाणी आणून ही आग विझवली .त्यामुळे आग इतरत्र पसरली नसल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र या आगीत कौलाचे संपूर्ण घरासह घरातील गहू , तांदूळ, डाळ, कपडे आदि जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या .या आगीत विष्णू फसाटे यांचे बरेच नुकसान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.