गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 1 जून नंतरच मिळणार कापसाचे बियाणे

0

पाचोरा दि. – 

तालुक्यात ज्या शेतकर्‍यांच्या  थोड्याफार प्रमाणात जलसाठा शिल्लक असतो असे 20 ते 25 टक्के शेतकरी 15 मे पासून कापसाची लागवड करतात. सन 2018 मधे मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांच्या कापूस पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  जुन महीन्यात कापसाची लागवड केल्यास बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी प्रकरणात होत असतो या मुळे  शासनाच्या कृषी विभागाने एक परीपपत्रच काढून या वर्षी 1 जुन नंतरच कापसाचे बियाणे विक्रेत्या व्यापार्‍यांना बियाने दिले जाणार असल्याचा निर्णय घेतला असल्याने 15 मे पासून कापसाची लागवड करता येणार नाही. या वाषयी राजकीय पदाधिकार्‍यांनाही   देण्यात आली आहे. यामुळे मे महिन्याच्या कापूस लागवडीस बगल दिला जाणार आहे, या मुळे काही  निराशा दिसून येत असली तरी काही शेतकरी इतर राज्यातून बियाणे आणून मे महिन्यात कापूस लागवडीसाठी सज्ज झाले आहेत.

पाचोरा तालुक्यात शेतकर्‍यांचे पांढरे सोने समजल्या जाणार्‍या कापूस पिक हे प्रमुख पीक असून,61 हजार 238  उपयुक्त हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 37 ते 37 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते, या  जवळपास 20 हजार हेक्टर क्षेत्रात 15 मे पासून कापसाची लागवड केली जाते मात्र या वर्षी अत्यल्प पावसाळा झाल्याने तालुक्यातील कोणत्याही प्रकल्पात जलसाठा शिल्लक नसल्याने व शासनाकडून 1 जुन पर्यंत बियाणे मिळणार नसल्याने  नुकतेच गिरणेचे चौथे आवर्तन सुटलेले असल्याने गिरणा काठावरील, लोहटार, अंतुर्ली, पुणगांव, मानडकी, ओझर, भातखंडे, परधाडे,दुसखेडा, वडगांव असेरी,  बु, परीसरातील शेतकरी ऊन्हाळी कापसाची लागवड करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे यामुळे या वर्षी केवळ 5 टक्के  ऊन्हाळी कापसाची लागवड होऊ शकते.

आखतवाडे येथे बोंड अळी वर मार्गदर्शन

आखतवाडे ता. पाचोरा येथे दिनांक 15 रोजी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत आत्मा योजनेअंतर्गत शेत्रीय किसान गप्पा गोष्टी या कार्यक्रमाचे  करण्यात आले होते. या पाल(रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ  बाहेती यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी व मका पिकावरील लष्करी अळींची ओळख प्रादुर्भाव, नियंत्रण व प्रतीबंधात्मक उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन केले तर प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी दिपक ठाकुर यांनी खरीप हंगामाची पूर्व तयारी यावर मार्गदर्शन करुन शेतकर्‍यांच्या शंकांचे  केले. जितेंद्र राजपूत यांनी प्रोजेक्टर वरून बोंड अळी विषयी  केले. यावेळी मंडळ अधिकारी एस. व्ही. जाधव, कृषी पर्यवेक्षक व्ही. एस. पाटील, सुनील साळवे, सचिन भैरव, प्रदिप मराठे, शेतकरी धनशिंग राजपूत, राजेंद्र राजपूत, संजय गढरी, गोविदशिंग परदेशी, महादू गढरी, चैनशिंग राजपूत, रविंद्र पाटील, तुकाराम पाटील, प्रमोद पाटील, माधव राजपूत, नारायण  सुधाकर गढरी सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.