गुलाबराव, शिरीष चौधरींना मंत्रिपद?

0

जळगाव (विशेष प्रतिनिधी) बहुप्रतिक्षीत महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येत आहे. उध्दव ठाकरे या सरकारचे नेतृत्व करणार असले तरी मंत्रीमंडळात त्यांचे सहकारी कोण असतील याबाबत कामालीची उत्स्कुता निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातून शिवसेनेच्या कोट्यातून गुलाबराव पाटील यांचे नाव निश्चित असले तरी त्यांना बढती मिळते का? की राज्यमंत्री पदावरच बोळवण होते हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसकडून जिल्ह्यातील एकमेव आमदार शिरीष चौधरी यांचे नाव राज्यमंत्रीपदासाठी घेतले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आ.अनिल पाटील यांनासुध्दा मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता होती. परंतु दैव देते आणि कर्म नेते अशीच त्यांची अवस्था झाली आहे.

गुलाबरावांना बढती मिळाणार?
शिवसेनेचे उपनेते आ.गुलाबराव पाटील हे चौथ्यांदा विधानसभेत निवडूण गेले आहेत. यूती शासनात त्यांनी सहकार राज्यमंत्री पद भूषविले. तेव्हा त्यांना कैबिनेट  मंत्रीपद देण्यासाठी शिवसेने पेक्षाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जास्त उत्सुक होते. मात्र, सेना नेतृत्वाने त्यांच्या कोट्यातील पद रिक्त असताना शेवटपर्यंत गुलाबरावांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिली नव्हती हा इतिहास आहे. यंदाच्या निवडणूक गुलाबरावांना मतदान म्हणजे कॅबिनेट मंत्र्यालाच मतदान असा प्रचार करण्यात आला आहे. यूतीचे सरकार अस्तित्वात आले असते तर गुलाबरावांना कॅबिनेट मंत्री पद सहज मिळालेही असते. मात्र, यूती तुटली आणि महाआघाडी अस्तित्वात आल्यामुळे आता मंत्रीपदांची तिन पक्षात वाटणी होणार आहे. परिणामी शिवसेनेच्या कोट्यातील मंत्रीपदे कमी होणार हे निश्चित असल्याने याचा सरळ फटका गुलाबरावांना बसण्याचीच शक्यता जास्त असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या कोट्यातील कॅबिनेट मंत्री पदासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गुलाबरावांची पुन्हा एकदा राज्य मंत्री पदावर बोळवण निश्चित मानली जात आहे. असे असले तरी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे येणार असल्याने गुलाबरावांना दुधाची तहान ताकावरच भागवावी लागणार का? हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल. शिरिष चौधरींना लॉटरी रावेरचे आ.शिरिष चौधरी हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ही योग्यवेळ असल्याने आ.चौधरी यांना काँग्रेसच्या कोट्यातून राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून यासंदर्भात जोरदार लॉबिंग सुरू आहे. काँग्रेसचे जेध नेते आणि  वडील स्व.मधुकरराव चौधरी यांचा समद राजकीय वारसा समर्थपणे चालविणाऱ्या शिरिष चौधरीच्या रूपात काँग्रेसला  जिल्ह्यात नवी भरारी घेता येवू शकते. आपल्या एकत्याच्या सामथ्यांवर त्यांनी उमेदवारी करून जिल्ह्यात काँग्रेसचे खाते उघडले. जिल्ह्यात काँग्रेस नावालाही शिल्लक राहिली नसतांना शिरीष चौधरी यांचा विजय काँग्रेससाठी स्वप्नवत आणि उत्साह वर्धक मानला जात आहे.

धुळे ग्रामिणचे आ.कुणाल पाटील हे उत्तर महाराष्ट्रातून काँग्रेसच्या कोट्यातून कैबिनेट मंत्री बनणार है असले तरी जळगाव जिल्ह्यातील गतवैभव प्राप्त करण्यासाठी काँग्रेसच्या धुरीणांकडून शिरीष चौधरी यांना राज्यमंत्री पद मिळू शकते.

चूकीला माफी नाही…!

दैव देते आणि कर्म नेते अशीच अवस्था अमळनेर येथील राष्ट्रवादीचे आ.अनिल भाईदास पाटील यांची झाली आहे. मळात मतदारसंघात निसटता विजय मिळाल्यानंतर राजकीय प्रगल्बता नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. अजित पवार यांच्या शपथ विधीला उपस्थित राहण्याची अतिउत्साहामुळ त्यांच्या हातून झाली. यानंतर अजित दादा आपले नेते असल्याचा त्यांचा सदेश महाराष्ट्रभर व्हायरल झाला. मात्र, नतर ते पन्हा माघारी परतले होते पक्षाने अजित  पवार याना माफ केले असले तरी आ.अनिल पाटील यांनी केलेल्या चूकीला माफी नाही…! असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीच्या सुत्रांनी दिले आहे. अनिल पाटील हे उत्तर महाराष्ट्रातून निवडूण आलेले राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत. त्यांनी संयम राखला असता तर त्यांना शंभरटके मंत्रीपद मिळाले असते. गुलाबराव देवकरानंतर पहिल्याच आमदारकीच्या सरू वेळी त्यांच्या झोळीत मंत्रीपदाची माळ पडली असती.

काँग्रेसच्या इतिहासाच्या सर्वधनासाठी संघाची निमंत्रण झुगारले!
निवडणूकीच्या काळात भाजपाने मोठ्या प्रमाणावर इन कमिंग सुरू केले होते.  जिल्ह्यात काँग्रेस रुजविण्याऱ्या स्व. धनाजीनाना चौधरी यांचे नातू, स्व. मधुकरराव चौधरी यांचे पुत्र शिरीष चौधरी यांनाच भाजपात घेण्यासाठी रणनीती आखली गेली होती. संघाचे पदाधिकाऱ्यांकडून अधिकृत प्रस्तावही शिरीष चौधरी यांच्याकडे आला होता. मात्र, आमदारकीसाठी भाजपात जाणे म्हणजे आपला काँग्रेसचा उज्ज्वल इतिहास पुसण्यासारखे होईल असे सांगत हे पाप कदाचित करणार नाही असे सांगून आ शिरीष चौधरी यांनी रावेरमधून काँग्रेसकडून खिंड लढविली आणि विजय संपादन केला. त्यांनी दाखविलेल्या या बाणेदारपणाचे कौतुक काँग्रेस श्रेष्ठी राज्यमंत्रीपद देऊन करावे अशी अपेक्षा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.