ना. गुलाबराव पाटलांकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांचे सांत्वन

0

शहीद जवान राजपूत यांना नतमस्तक होवून केले अभिवादन

जळगाव : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले जवान संजयसिंग राजपुत यांच्या अंत्यविधीस्थळी जावुन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी कुटुंबाची भेट घेवुन सांत्वन केले. तसेच ना. पाटील यांनी नतमस्तक होवून अभिवादन केले. त्यानंतर कुटुंबियांना व्यक्तिगत 50 हजार रूपयांची रोख मदत केली. ना. गुलाबराव पाटील यांनी शहीद जवानाच्या मुलाला पोटाशी कवटाळून धीर दिला.

पाकड्यांनी बेसावध असलेल्या भारतीय वीर जवानांवर पाठीमागून जो वार केला त्या वारामध्ये सांडलेले रक्त वाया जाणार नाही. प्रत्येक रक्ताच्या थेंबाची किंमत पाकड्यांना मोजावी लागणार असल्याचा इशारा राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते ना.गुलाबराव पाटील यांनी दिला. ना. पाटील यांनी १८ फेब्रुवारी रोजी शहीद स्व.संजयसिंह राजपूत यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली.
यावेळी ना.गुलाबराव पाटील व तालुका-शहर शिवसेनेच्या वतीने शहिदांच्या कुटुंबियांना ५० हजार रूपये नगदी रोख स्वरूपात मदतही दिली. प्रारंभी ना. पाटील यांनी शहीद संजयसिंह राजपूत यांच्या अंत्यविधीस्थळी जाऊन नतमस्तक होत विनम्र अभिवादन केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना मलकापूर जिल्हा प्रमुख शांताराम दाणे, जळगाव जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हा प्रमुख वसंतराव भोजने, शिव व्यापारी सेनेचे जिल्हा प्रमुख ऊमेश पाटील, शहर प्रमुख किशोर नवले, तालुका प्रमुख विजय साठे, ऊमेश हिरूळकर, विनायक जवरे, मुकेश लालवानी, नितीन गोसावी, गोलू नवले, उमेश राऊत, ओंकारसिंग डाबेराव, विनायक बोरसे, गणेश ठाकूर, योगेश जैस्वाल, निना किनगे, वेदांत ढेकळे, गजानन धाडे, सुरेश अहिर, संभाजी सहावे, विनोद बोदडे, संतोष घोडके, दीपक जवरे, योगेश ढगे, सौ.कोमल गारमोडे, रितेश दहीभाते, शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.