गिरीश महाजनांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा निघाला एसटीचा कंडाक्टर

0

जळगाव : जामनेर येथील माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला जामनेर पोलिसांनी अखेर अटक केली. ‘एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ,’ अशी धमकी गिरीश महाजन यांना देण्यात आली होती. याप्रकरणी जामनेर पोलिसांनी तपास करत दोन दिवसात धमकी देणाऱ्याला अखेर बेड्या ठोकल्या आहेत महाजनांना धमकी देणारी ती व्यक्ती पाचोरा एसटी डेपो येथे वाहक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.

जामनेर येथील माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशनच्या ग्लोबल मल्टिस्पेशलटी हॅास्पीटलच्या उघाटन  कार्यक्रम 14 ऑक्टोबरला पार पडला. या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते. दरम्यान, यावेळी कार्यक्रम सुरू होण्यापूवी गिरीश महाजन यांचे स्विससहाय्यक दिपक तायडे यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन येवून चारी ही बाजूने बाँम्ब लावले असून पाच वाज्यापर्यंत एक करोड पाठव अन्यथा बाँम्ब स्पोट करेल अशी धमकी दिली होती.

या प्रकरणी जामनरे येथे तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता. पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सायबर क्राईम, स्थानीक गुन्हे शाखा व जामनेर पोलीस स्ठेनचे असे तीन पथक नेमले होते. त्यानुसार पथकाने पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर, पहुर परिसरात संशयीताचा शोध घेतला. लोकांशी केलेली विचारपुस तसेच तांत्रिक पद्धतीने शोध घेवून आरोपी अमोल देशमुख (वय ३२) पहुरपेठ, ता. जामनेर हा असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला गुरूवारी अटक करण्यात आली असून अटकेवेळी त्याच्याजवळ तेरा मोबाईल जप्त करण्यात आले आहे. आरोपी पाचोरा डेपो येथे बस कंडक्टर म्हणून कामाला आहे. आरोपीला न्यायालयात आरोपीस हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.