गिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय व इतर कर्मचाऱ्यांची कोविड १९ ची स्वँब तपासणी

0

भातखंडे (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र गिरड येथे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या व्ही सी मधील सूचनेनुसार जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची covid-19 तपासणी करण्याबाबतच्या सूचना जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या असून त्यानुसार भडगाव तालुक्यातील गिरड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय निमशासकीय खाजगी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांची covid-19 तपासणी करण्यात येत असून दिनांक १६/१०/२०२० शुक्रवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात अशीच तपासणी करण्यात आली.

यात अंगणवाडी सेविका मदतनीस जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व कर्मचारी माध्यमिक शाळेतील सर्व कर्मचारी यांची गिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली यावेळी १४८ कर्मचाऱ्यांची रॅपीट टेस्ट करण्यात आली तर ५  आर टी पी सी आर टेस्ट करण्यात आल्या असुन सर्व चाचण्या तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने covid-19  पीसीआर चाचण्या यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्या.

चाचणी घेण्यासाठी दीपक दीक्षित, बी एम धनगर, आरोग्य सहाय्यक आर डी बसेर, आरोग्य निरीक्षक अधिकारी एस बी शिंपी, ए व्ही पाटील, आर एन वाडे, एम वाय तडवी, के आर वाणी आरोग्य सेवक, श्रीमती बी एस गावित आरोग्य सहायिका, श्रीमती जीआर बुरी, श्रीमती के के बहिरूपे आरोग्यसेविका,अनिल एन पवार, महेंद्र अशोक वाणी परिचर,अमोल लक्ष्मण मनोरे ड्रायव्हर या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.