गाडी चालवताय ; तर जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा दर

0

नवी दिल्ली : मागील दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरमध्ये झालेल्या भरमसाठ दरवाढीने सलग दोन दिवस संसदेत विरोधकांनाही केंद्र सरकारला घेरले आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. सलग बाराव्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

आज गुरुवारी मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपयांवर कायम आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८८.६० रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९१.१७ रुपये आहे. डिझेलचा भाव ८१.४७ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९३.१७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.४५ रुपये भाव आहे.

कोलकात्यात आज पेट्रोल ९१.३५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.३५ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.२२ रुपये असून डिझेल ८६.३७ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.७६ रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर ९९.२१ रुपयांवर स्थिर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.