गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जीवनशाळेत गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण

0

जळगाव प्रतिनिधी (ता.31)-
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त नंदुबार जिल्ह्यातील जीवननगरातील आदिवासी बांधवांनी गांधीजींना आदरांजली वाहिली. यावेळी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची भेट दिलेल्या पुतळ्याचे जीवनशाळा येथे अनावरण आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, ज्येष्ठ गांधीवादी सुगन बरंठ, तोरणमाळचे माजी सरपंच सीताराम पावरा, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी विनोद रापतवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सरदार सरोवरातून विस्तापीत झालेल्यांचे पुनर्वसन जीवननगर (नंदुरबार) येथे करण्यात आले आहे. नर्मदा नवनिर्माण अभियानांर्तगत नऊ शाळांची निर्मिती करण्यात आली आहे. जीवननगरातील ङ्गजीवनशाळाफ ही त्यातीलच एक. यात शाळेत महात्मा गांधीजींचा पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने भेट देण्यात आला आहे. यावेळी आमदार डॉ. तांबे यांनी मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनाचे महत्त्व सांगून गांधी विचारांची आज आवश्यकता असल्याचे सांगितले. गांधीजींनी सत्याग्रहाद्वारे स्वातंत्र्य मिळवून दिले. नर्मदा बचाव आंदोलन त्याच पावलावर पाऊल ठेवून चालले आहे. आदिवासी भागातील शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
माजी मंत्री पद्माकर वळवी म्हणाले की, गांधीजींच्या विचारांचे आचरण केल्यास युवाशक्तीला निश्चित ध्येय आणि दिशा मिळू शकेल. सरकारने राबविलेल्या वृक्षलागवड योजन तरूणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल.
मेधा पाटकर म्हणाल्या की, आज देशात सुरू असलेल्या हिंसक आणि जातीय तणावाच्या घटनांवर गांधीजींच्या अहिंसा तत्त्वांद्वारेच विजय मिळवता येऊ शकेल. जीवनशाळेतून शिक्षीत झालेले विद्यार्थी देशाच्या सेवेसाठी गांधी विचारांचा अवलंब करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विनोद रापतवार यांनी सरोजिनी नायडू, पिजांरीबाई यांच्या कार्याचा उल्लेख करून मेधा पाटकर यांच्या कार्याचे कौतूक केले. चोपड्याचे प्रदीप पाटील, नंदुबाराचे जयंत पाडवी, सरपंच दोधीबाई, पुण्या वसावे, जेलसिंग पावरा यांनी मनोगत व्यक्त केले. नवीन मिश्रा यांनी ङ्गबापू के बंदरफ हे गीत सादर केले. चेतन साळवे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.