गजानन भार्गव यांची भाजपा रावेर तालुका व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्ष पदी निवड

0

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज भाजपा कार्यालय रावेर येथे भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत गजानन भार्गव सावदा यांची भाजपा रावेर तालुका व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

तसे नियुक्ती पत्र जिल्हा उपाध्यक्ष पद्माकरभाऊ महाजन, शिवाजीराव पाटील, ता. अध्यक्ष राजनभाऊ लासुरकर यांनी रावेर भाजप कार्यालयात येथे दिले.

निवडीनंतर जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन, भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रंजनताई पाटील, भाजपा किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेशभाऊ धनके, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रल्हादभाऊ पाटील यांनी  शुभेच्छा दिल्या.

तसेच कार्यालयात उपस्थित जिल्ह्या उपाध्यक्ष पद्माकरभाऊ महाजन, मा.संगायोचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, तालुका अध्यक्ष राजनभाऊ लासुरकर, तालुका सरचिटणीस महेशभाऊ चौधरी, सि.एस. नवनिर्वाचित सावदा माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शहर अध्यक्ष जे.के. भारंबे, माजी सावदा शहराध्यक्ष परागभाऊ पाटील, बेटी बचाव बेटी पढावच्या जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण, संतोष परदेशी, अतुल ओवे यासह कार्यकर्त्यांनी रावेर कार्यालय येथे त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.