खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोघां तरुणांचे गावकऱ्यांनी वाचवले प्राण

0

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकेगाव येथून जवळच असलेल्या तापी नदीच्या पात्रात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या भुसावळ येथील दोन युवकांचे प्राण प्रसांगावधान राखून साकेगाव येथील काही नागरिकांनी वाचवल्याची घटना येथे बुधवार १५ जुलै रोजी घडली.

भुसावळ येथील जेतरम सीताराम बारेला,हिरालाल प्रेमसिंग बारेला रा.गजानन मंदिराजवळ, भुसावळ मुले तापी नदीवर खेकडे पकडण्या करीता  बुधवार १५ जुलै रोजी दीड वाजेचे सुमारास  गेले होते . खेकडे पकडण्याचे नादात नदीपात्रात आतमध्ये  खडकावर गेले  होते. आज झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाच्या ३६ दरवाजातून पाण्याचा मोठया प्रमाणावर विसर्ग होत असल्याने तापी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याचे या युवकांच्या लक्षात आले नाही.

मात्र, पाण्याचा प्रवाह वाढल्याचे दिसताच भीतीपोटी त्यांनी आरडाओरड केली ,त्यांना तापी तीरा वर (काठ ) येता येत नव्हते ते पाण्यात खड़कावर अडकून पडले. अत्यंत भयभीत झाल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान तेथून जाणारे साकेगावचे शेतकरी विजय भोळे यांनी बघितले लगेच ग्रां.प. सदस्य प्रवीण पवार, जितेंद्र पाटील यांच्यासह रोशन, कोळी, भूषण कोळी, मुकेश कोळी, सह काही युवक व नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आली त्यांनी त्वरीत धावपळ करून पट्टीचे पोहणारे मंगल कोळी व देवीदास चहाटे यांनी  दोर आणून अतिशय हिंमतीने त्या दोघां तरुणांना दोर बांधून  बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले.

Leave A Reply

Your email address will not be published.