खूशखबर! मान्सून मुंबईत दाखल

0

मुंबई : जून महिना संपत आला तरी देखील महाराष्ट्रात अद्याप मोठा पाऊस झालेला नाही. दरम्यान आज मुंबईसह राज्यभरात मान्सून दाखल झाल्याचे वृत्त हवामान खात्याने जाहीर केले आहे. परंतु राज्यातील अनेक भाग अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईतल्या काही उपनगरांमध्ये आज (बुधवार) पहाटे मान्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली आहे. अंधेरी, जोगेश्वरी आणि सांताक्रूझ परिसरात पावसाच्या हलक्या सरी सुरु आहेत. त्यामुळे मान्सूनची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

आठवड्याभरापूर्वी मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश आहे. त्यानंतर काही दिवसात मान्सून राज्यभरात हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मान्सूनने राज्य व्यापले आहे. परंतु राज्यातील अनेक भागांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. परंतु नागरिक आणि शेतकरी पावसाने जोर धरण्याची वाट पाहात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.