खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्याची राजकारणात एन्ट्री

0

हैदराबाद :- आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रसिद्ध मंडळी आणि कलाकारांनी राजकारणात आपला मोर्चा वळविला आहे. अशातच तेलुगू चित्रपटसृष्टीत विनोदी कलाकार म्हणून नावारुपास आलेल्या आणि आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेता अली यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत अली यांनी सोमवारी पक्षप्रवेश केला. येत्या लोकलभा निव़डणूकांच्या रिगणात ते उतरणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. याबाबतचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

खुद्द अली यांनीच राजकारणात असणाऱ्या त्यांच्या स्वारस्याविषयी आणि वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याविषयी जगनमोहन रेड्डी यांना सांगितलं होतं. ज्यानंतर त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर मुळच्या आंध्र प्रदेशातील राजामुंद्री येथील असणाऱ्या अली यांनी राजकारणात प्रवेश केला. वायएसआर काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनही याविषयीची माहिती देण्यात आली. अनेक प्रसिद्ध मंडळी आणि कलाकारांनी वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले आहे. तेलुगू देसम पार्टीशी झालेल्या मतभेदानंतर ज्येष्ठ अभिनेत्री जयासुधा आणि त्यांचा मुलगा निहारनेही वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

यापूर्वी जयललिता, रजनीकांत, कमल हासन, चिरंजीवी, पवन कल्याण, प्रकाश राज, एन.टी.रामाराव या सारखी मंडळी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर राजकारणाकडे वळाली. जयललिता, एन.टी.रामाराव यांच्यासारख्या कलाकारांनी तर राज्याचे मुख्यमंत्रीपद देखील भूषविले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.