खरीप हंगामात शेतकरी होतोय कंगाल, मात्र मंजूर व व्यापारी मालामाल

0

निपाणे ता एरंडोल (वार्ताहर) : सध्या शेतकरी वर्ग  आहे त्या परिस्थितीत खरीप हंगाम घरात आणत असून महागडी मजूरी शेतकऱ्यांंचे चांगलेच कंबरडे मोडत आहे. कपाशी मका सोयाबीन ज्वारी बाजरी आदी पिके एकाच वेळी काढणीत आल्याने मजूरांची चांगली चणचण भासत असून मजूरांचे दरही वाढले आहेत. सध्या कापूस वेचणी साठी महिला मजूरी २०० रुपये तर माणसाला ३०० ते ३५० रुपये मजूरी द्यावी लागत आहे तसेच काही मजूर रोजंदारी ने काम करण्यापेक्षा उधळी कामे घेवून मोठा पैसा कमवत आहेत. तसेच व्यापारी कमी भावात शेतीमाल खरेदी करत आहेत त्यामुळे व्यापारी व मजुराची चांगलीच चांदी होताना दिसत आहे. शासनाने लवकरात लवकर हमी भाव जाहीर करावा अन्यथा शेतकरी वर्गाला व्यापारी लुटल्या शिवाय राहाणार नसल्याचे चित्र समोर येत आहेत.

आज कापूस ३५०० शे ४००० रुपये दरम्यान खरेदी करत आहेत मका ९०० ते १००० रुपये प्रति क्विंटल खरेदी करत आहेत म्हणजे सर्वंच शेत मालाची व्यापारी लुट करुन  शेतकऱ्याला फसवत आहेत  तरी शासनाने त्वरीत हमी भाव जाहीर करुन लुटमार थांबवावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.