खडकदेवळा येथे डंपरच्या कर्कश आवाजाने चेंगराचेंगरीत गुदमरुन 65 मेंढ्या दगावल्या

0

पाचोरा दि.29 –
खडकदेवळा खु ता. पाचोरा येथील सरपंचाच्या शेतात गेल्या 4/5 दिवसांपासुन नगरदेवळा येथील मेंढ्यांचा कळप मुक्कामी होता. दरम्यान मेंढपाळाच्या मुलाचा दि. 28 रोजी विवाह असल्याने ते यवतमाळ जिल्ह्यात विवाहासाठी गेलेले असल्याने गेल्या दोन दिवसांपासुन मेंढ्यांच्या पोटात अन्नाचा कण व पाण्याचा थेंब नसल्याने दुपारी 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान मेंढपाळ मेंढ्यांना हिवरा प्रकल्पात पाणी पाजण्यासाठी घेऊन जात असतांना झाडाखाली उभ्या असलेल्या डम्पर चालकाने अचानक कर्ण कर्कश हॉर्न वाजविल्याने रस्त्यावरील मेंढ्यांच्या कळपातील 3/4 मेंढ्या जवळच असलेल्या पाटचारीत घसरुन पडल्या. व त्यावर मेंढ्यांचा कळपच आदळल्याने चेंगराचेंगरी होऊन सुमारे 5 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 65 मेंढ्या दगावल्याची घटना घडली आहे.
नगरदेवळा ता. पाचोरा येथील अहिल्या नगर मध्ये राहत असलेल्या लक्ष्मण चिंधा खांडेकर यांचेसह पाच ते सहा कुटुंबातील मेंढ्याचा कळप खडकदेवळा येथील सरपंच शामकांत शेलार यांच्या शेतात मुक्कामी होत्या. दि. 28 रोजी लक्ष्मण खांडेकर यांच्या मुलाचा यवतमाळ जिल्ह्यात विवाह होता. घटनास्थळी मेंढपाळांचे केवळ तीन ते चार लहान मुले असल्याने मेंढ्यांच्या पोटात दोन दिवसांपासुन अन्न पाण्याचा कण नसल्याने दि. 29 रोजी सकाळी 11 वाजता विवाह आटोपुन परत आल्यानंतर मेंढपाळाने शेताच्या बाजुलाच असलेल्या हिवरा प्रकल्पात मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी नेत असतांना सद्यस्थितीत जळगांव – नांदगांव महामार्गाचे काम सुरू असल्याने या रस्त्याच्या कामासाठी हिवरा प्रकल्पातुन डम्पर द्वारे मुरुम वाहिला जात आहे. उन्हा पासुन विश्रांती मिळण्यासाठी डम्पर चालकांनी दोन डम्पर झाडाच्या सावलीखाली उभे केलेले होते. याच वेळी मेंढपाळ मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी घेवुन जात असतांना डम्पर चालकाने आपले वाहन सुरू करुन अतिशय जोराने हॉर्न वाजविला. हॉर्नच्या कर्ण कर्कश आवाजामुळे 3 ते 4 मेंढ्या घाबरुन पडत असतांना पाटचारीत पाय घसरून पडल्या. व याचवेळी इतर मेंढ्या त्यांच्या अंगावर पडल्याने एकमेकांच्या अंगावर पडल्यामुळे व उष्णतेच्या लाटेमुळे लक्ष्मण चिंधा खांडेकर (40), नाना त्रंबक नामदास (08), अंबादास नामदास (06), रमेश खांडेकर (05), किसन साहेबराव बडांगे (04) अशा सुमारे 5 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 65 मेंढ्या दगावल्या. गरिब मेंढपाळांचे मोठे नुकसान झाल्याने सर्वच मेंढपाळ कुटुंबीय औसाबौक्शी करुन रडायला लागली होती. मात्र डम्पर चालक आपली वाहने घेवुन पसार झाले. दरम्यान तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक महाजन, डॉ. एस.जी. मडावी, डॉ. गौतम वानखेडे , डॉ. सी.बी.परदेशी, डॉ. डी.एन. पाटील यांनी मेंढ्यांचे शवविच्छेदन केले. उपस्थित नागरिकांमध्ये मेंढ्यांनी ज्वारीच्या दुरीचा चारा खाल्यांने विष बाधा झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. डॉ. अशोक महाजन यांनी मेलेल्या मेंढ्यांचे व्हीसेरा नाशिक येथे पाठविणार असल्याचे सांगितले असुन मेंढ्यांचा मृत्यू उष्मघाताने झाला की विषारी चारा खाल्याने झाला ? हे लॅब मधुन रिपोर्ट आल्यानंतर कळणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.