अश्विन खैरनार यांची राज्याच्या मुख्य तपास अधिकार म्हणून नियुक्ती

0

चाळीसगांव – येथील सामाजिक, कार्यकर्ते तथा युवा रंगकर्मी तसेच जिल्हा अध्यक्ष अश्विन खैरनार यांची क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशन अंतर्गत नीती आयोग दिल्ली ,यांची नुकतीच महाराष्ट्र राज्यच्या मुख्य तपास अधिकारी CIO state “चिफ इन्वेस्टिंगशन ऑफिसर” म्हणून त्यांची चाळीसगांवत झालेल्या प्रदूषण संवर्धन रॅलीच्या कार्यक्रमात कामगिरी बघून यांची राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश गुप्ता यांनी बढती देऊन नियुक्ती केलीे.

नियुक्ती पत्र आमदार मंगेश चव्हाण व राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश गुप्ता व प्रदीपदादा देशमुख गटशिक्षणाधिकारी विलास भोई प्रा.एस आर जाधव सर प्रा.चंद्रकांत ठोंबरे अन्य मान्यवरांच्या यांच्या हस्ते देण्यात आले निश्चितच चाळीसगांव कराना ही अभिमाची बाबा आहे . त्यामुळे जे गुन्हे किंवा भ्रष्टाचार करतील त्यांच्यावर त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कारवाई करण्यात येईल त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न लवकर सुटावेत त्यासाठी कुठलीही आर्थिक झळ बसू नये यासाठी कोणाचाही तक्रार असल्यास लगेच संपर्क करावा माझा कायम प्रयत्न असेल.देशसेवे साठी व हितासाठी वेगवेगवेळे उपक्रम राज्यात राबवू अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. त्यांचे जिल्ह्यातून सर्व स्तरावर अभिनंदन केले होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.